ही गोष्ट कदाचित तुमचे जीवन बदलून टाकेल | Best Powerful Motivation in Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

 आज आम्ही जे सांगणार आहोत ते लक्षपूर्वक ऐका, ही गोष्ट कदाचित तुमचे जीवन बदलून टाकेल. एका शाळेत दोन मित्र सोबत शिक्षण घेत होते, दोघांचा वर्ग एकच होता. दोघेही मध्यमवर्गीय घरातून होते, दोघेही अभ्यासात खूप चांगले होते. दोघेही संध्याकाळी सोबत खेळत असत आणि सोबतच शाळेत जात असत. मोठे होऊन तो एक आयएएस ऑफिसर बनतो आणि दुसरा एक छोटीशी प्रायव्हेट नोकरी करत असतो. असे काय घडले त्या मुलाच्या सोबत ज्यामुळे तो मोठं होऊन आयएएस होऊ शकला? त्याला कारण मिळाले होते! 

 

विज्ञापन ADVERTISEMENT

दोघांची घरची परिस्थिती एक सारखी होती, अभ्यासात देखील दोघ सारखेच होते परंतु एक दिवशी असे काही झाले होते की त्याने या मुलाचे जीवन बदलले होते. त्या मुलाच्या वडिलांना कामावरून काढून टाकले होते. ते खूप दुःखी होते, त्यांनी घरी येऊन काही सांगितले नाही परंतू त्या मुलाला ते कळून गेले. रात्री त्याने त्याच्या वडिलांचा आवाज ऐकला की माझी देखील सरकारी नोकरी हवी होती, मी कोणी अधिकारी असतो तर कोणाची हिंमत नव्हती की मला लाथ मारून बेइज्जती करून नोकरीवरून काढून देईल! 

 

त्या मुलाला कारण मिळाले, त्याने तिथेच शपथ घेतली  की लाल बत्तीच्या गाडीत माझ्या वडिलांना अभिमानाने फिरवेल, जेणेकरून त्यांना देखील माझ्यावर गर्व असेल. मित्रांनो जीवनात कारण असणे खूप गरजेचे असते. 

विज्ञापन ADVERTISEMENT

 

कारण नसताना या विश्वात काहीच होत नाही, तुम्ही कितीही विचार कराल, कितीही निश्चय कराल, कितीही मोठे स्वप्न बघाल परंतु तुमच्या जीवनात तुम्ही जे मिळवु इच्छिता त्यासाठी काही ठोस कारण नसेल तर ते यश मिळवणे शक्य होणारच नाहि.

 

विज्ञापन ADVERTISEMENT

मित्रांनो हृदय जेव्हा तळमळून उठते ना तेव्हा तुम्ही काहीही करायला तयार होता. जेव्हा रे कारण त्याला पिळवटून काढते ना तेव्हा ते तुम्हाला ध्येय प्राप्ती होई पर्यंत सुखाने बसू देखील देत नाही. तुम्हाला ते कारण मिळणे इतके कठीण देखील नाहीये. 

 

कधीतरी स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघा, जेव्हा कधीतरी कोणीतरी तुम्हाला तुमच्या परिस्थितीवर हसत असेल , बेइज्जती करत असेल ना तेव्हा ती जखम तुम्हाला तुमच्या हृदयावर झालेली दिसेल. बेइज्जती, कठिणता, त्रस्त असणे हे तुमच्या जीवनात आपोआप येत असेल तर त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजे कारण त्याने तुम्हाला एक कारण मिळाले आहे!

 

परंतु आपण काय करतो, आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो, त्या कठीण काळाला दोष द्यायला लागतो, परंतु आपल्याला हे माहीत नाहीये की ते आपल्याला कारण देत आहे जीवनात पुढे जाण्यासाठी! मित्रांनो जर कारण नाही तर ध्येय नाही. त्यामुळे जीवनात काहीतरी नक्की मोठं करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की जितकं मोठं तुमच्याकडे कारण तितकं मोठं यश तुम्हाला मिळेल. 

 

हे देखील वाचा

भारतातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारी राज्ये 

 


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.