पॉवरफुल मॉर्निंग मराठी मोटिवेशन | Morning Motivation Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

पॉवरफुल मॉर्निंग मराठी मोटिवेशन | Morning Motivation Marathi

पैसे मनुष्याला वर घेऊन जाऊ शकतात परंतु लक्षात ठेवा मनुष्य पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. सृष्टीने मनुष्याला केवळ दोनच मार्ग दिलेले आहेत, एकतर देऊन जा किंवा सोडून जा! सोबत घेऊन जाण्याची काही व्यवस्था नाहीये. कोणाचा सरळ साधा स्वभाव ही त्याची कमजोरी नसते. या विश्वात पाण्यापेक्षा सरळ कोणीच नाहीये, तरी देखील त्याचा प्रवाह हा मोठ्यात मोठ्या दगडाला देखील तोडू शकतो. जीवनातील सर्वात महाग गोष्ट आहे तुमचे वर्तमान! जो एकदा निघून गेला तर संपूर्ण जगाची संपत्ती देऊन देखील विकत घेता येत नाही.  

जीवनाविषयी तक्रार तर त्यांची देखील आहे ज्यांना जीवनात सर्व काही मिळाले आहे. कोणालाही तितकेच ज्ञान द्या जितके तो समजू शकेल. कारण बादली भरल्यानंतर नळ बंद केला नाही तर पाणी हे वाया जाते. अजब लोक आहेत या जगात, अगरबत्ती देवासाठी खरेदी करता आणि त्याचा फ्लेवर स्वतःच्या आवडीचा घेता.  

विज्ञापन ADVERTISEMENT

जीवनात काही न करण्याची किंमत ही चुकीचं करण्याच्या किमतीपेक्षा खूप जास्त असते. दुसऱ्यांचे दोष शोधण्यात वेळ घालवू नका.. असे केल्याने स्वतःमध्ये सुधारणा करण्याची व्याप्ती देखील संपुष्टात येते. वाईट संगत ही त्या कोळश्या प्रमाणे आहे जो गरम असेल तर हात भाजवतो आणि थंड झाल्यावर हात काळे करतो. 

 मिळकत कमी असेल ना तर खर्चावर नियंत्रण ठेवा, माहिती कमी असेल तर आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. व्यक्तीचा खरा धर्म हे त्याचे कर्तव्य आहेत, जर कोणी त्याचे कर्तव्य पूर्ण इमानदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करत असेल तर त्याला धार्मिक होण्यासाठी काही आणखी करायची गरज नाही. नातं टिकवायला बुद्धी नाही हृदयाची शुद्धी असायला हवी.  

खरं बोला स्पष्ट बोला, सुंदर असलेलं खोटं देखी बोलू नका, मग कोणी खुश असू देत किंवा कोणी रुसून बसू देत.  

विज्ञापन ADVERTISEMENT

जीवनात हे बघणे महत्वाचे नाहीये की कोण आपल्या पुढे आहेत आणि कोण आपल्या पाठीमागे, हे देखील बघणे गरजेचे आहे की कोण आपल्यासोबत आहे आणि आपण कोणाच्या सोबत आहोत. अरे परमेश्वराने झाडांची दोन पाने देखील एकसारखी बनवलेली नाहीत, प्रत्येकाचा काहीतरी एक वेगळेपणा आहे. त्यामुळे दुसऱ्यावर जळून पुढे जाण्यापेक्षा आपल्यातील गुण ओळखा, यातच खरा आनंद आणि समाधान आहे. लक्षात ठेवा, अंधारात सावली, वृद्धपकाळात शरीर, आणि शेवटच्या वेळी माया ही कोणाची सोबत देत नसते. क्रोध हवेची ती लाट आहे जी बुद्धीच्या दिव्याला विझवून टाकते, ज्याच्या भाषेत सभ्यता असते त्याच्याच जीवनात भव्यता असते.

 अरे वेड्यांनो माझ्या दुःखांवर हसणे सोडून दे, मी तो नाहीये जो वादळाला घाबरून जाईल! 

 मरण लिहिलेले असेल नशिबात तर लढून मरेल, इतका घाबरट नाहीये की बोलण्याने घाबरून जाईल!

विज्ञापन ADVERTISEMENT

 रस्ता ही माहीत आहे आणि चालायचं देखील माहीत आहे, मी आग आहे त्यामुळे जळण देखील माहीत आहे!

 मला मेण समजू नका जे वितळून जाईल, मी सूर्य आहे अस्त होऊन उदय व्हायचं देखील माहीत आहे!

 या लेखामध्ये सांगितलेल्या गोष्टींशी तुम्ही सहमत असाल तर एक संकल्प करूयात की जी चूक काल झाली आहे ती आज तुम्ही करणार नाही. 

Read more ????????????

Mumbai VS Banglore City Comparison


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.