Moral stories in marathi | Bodh katha marathi | stories with moral in marathi

Moral stories in Marathi | Bodh Katha Marathi | Stories with moral in Marathi

Moral stories in Marathi: आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला Marathi Moral Stories सांगणार आहोत. लहानपणी तुम्ही आजी-आजोबांकडून या गोष्टी ऐकल्या असतील. या कथा अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहेत. या Marathi  Bodh Katha मधून तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी करू शकता.
या मराठी बोधकथा खूप रंजक आहेत. जे वाचून तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खूप मजा येईल. यामध्ये New moral short stories in Marathi 2022 मधील काही नवीन नैतिक लघुकथा दिल्या आहेत. जेणेकरून तुम्हाला नवीन वाटेल. जुन्या कथा वाचून कंटाळा आला असेल तर, येथे आम्ही तुम्हाला 30 Moral stories in Marathi for kids दिल्या आहेत.

गरुड आणि घुबड | Eagle and Owl moral story in Marathi

Eagle and Owl moral story in Marathi

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.

घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’

घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला!

आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.

तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’

तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास ो.

 

मूर्ख डोमकावळा | Murkh Domkavala Marathi Katha

Murkh Domkavala Marathi Katha

एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले.

‘गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.

त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली.

तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,”बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो” यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,” या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.”

तात्‍पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.

मराठी

Birthday Poem In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Birthday Kavita in Marathi

 Birthday Poem In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

Birthday Poem In Marathi: मित्रांनो, Birthday Marathi Kavita या पोस्टमध्ये वाढदिवसाच्या काही उत्कृष्ट कविता दिल्या आहेत. अनेकदा मुलांना शाळेतही मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता लिहिण्यास सांगितले जाते.
 
वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात दरवर्षी येतो. हा दिवस त्याच्यासाठी खूप खास आहे. कारण या दिवशी त्यांचे प्रियजन त्यांना, शुभेच्छा, भेटवस्तू आणि भरपूर प्रेम देतात. काही लोक त्यांच्या वाढदिवसाला कविता वाचून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
 
तर चला मग मित्रांनो खाली काही Happy Birthday kavita in Marathi दिल्या आहेत, त्या वाचूया. मला आशा आहे कि तुम्हा सर्वांना या happy birthday poem in marathi आवडतील. तसेच या Marathi Birthday Poem तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Happy Birthday Poem in Marathi 

Happy Birthday Poem in Marathi

 

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
 
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
 
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
 
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
 
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
 
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!… .

Poem on birthday in Marathi

Poem on birthday in Marathi

 

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
 
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
 
आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
 
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
 
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।