Marathi Katha | Marathi Goshta | Marathi Story | Stories in Marathi | marathi goshti

Marathi Katha | Marathi Goshta | Marathi Story | Stories in Marathi | Marathi goshti

Stories in Marathi: मी आजच्या या लेखामध्ये लहान मुलांसाठी Marathi Katha घेऊन आलो आहे. या सर्व कथा लहान मुलांना जीवनाचे धडे शिकवायला मदत करतील. 

मुलांच्या वाढ आणि विकासात Marathi Katha महत्त्वाची भूमिका बजावतात. लहान मुलांच्या भाषेत नवीन शब्द आणि कल्पना मांडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे Marathi Goshti. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगण्यामुळे मुलांना आकार, स्थान, रंग, वर, संख्या आणि वस्तूंची नावे यासारख्या संकल्पना शिकण्यास मदत होते. कथा वाचून, मुले अधिक जटिल कल्पना सोप्या पद्धतीने शिकतात. Stories in Marathi च्या आजच्या या लेखात मुलांसाठी मजेदार, शैक्षणिक आणि विशेष कथांचा संग्रह आहे आणि प्रत्येक कथेमध्ये एक लपलेला संदेश आहे जो मुलांसाठी उपयुक्त आहे.

शापित राजपुत्र | Shapit Rajputra Marathi Katha

Shapit Rajputra Marathi Katha

 

विजय नगरीत एक राजा राज्य करीत होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याने पुष्कळ जप-तप केले, पण मूल काही झाले नाही. त्यामुळे राजा-राणी दोघे नेहमी उदास असत. एकदा एक जादूगार साधूचा वेष घेऊन आला आणि राजाला म्हणाला, ‘जर तुम्ही मला वचन देत असाल, तर मी तुम्हाला दोन मुलगे देईन.’ राजा म्हणाला, ‘मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन.’ मग साधू म्हणाला, ‘तुम्हाला दोन मुलगे लवकरच होतील, पण ते दहा वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजेत.’ राजाने विचार केला की, दहा वर्षे म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला दहा वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले.  साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. दहा वर्षे केव्हा निघून गेली ते राजा-राणीला कळलेही नाही. आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू मागला. राजाने मुलगे देण्याचे नाकारले, पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची. 

इकडे राजा-राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा-राणीने त्याला ‘तू आमच्या बरोबर चल’ असे म्हटले. मुलाच्या मनातसुध्दा त्यांच्याबरोबर जायचे होते, पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा-राणी आणि मुलांची ही भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले. पण आता दुसर्‍या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा-राणीला म्हणाला, ‘आई-बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐका. माझा लगाम कधी कुणाला देऊ नका.’ 

दुसर्‍या दिवशी राजा-राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने पाचशे सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला, पण राजा-राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई-वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडादेखील मिळाला. 

तो साधू मुलाच्या शोधातच होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा-राणीकडे गेला आणि त्याला पाचशे सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला. त्यांनी लगाम साधूला दिला. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सारे कळले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त होते. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली. साधूने तो मासा पकडला. इतक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला. त्याबरोबर साधू ससाणा होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला. 

तो मासा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळय़ात घालून असायची. 

साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तर्‍हेतर्‍हेचे डोंबार्‍याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरीच अप्रतिम झाले. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला ‘तुला काय हवे?’ असे विचारले. साधू म्हणाला, ‘राजा, तुझी मुलगी जी मोत्यांची माळ घालते ती मला दे.’ राजकन्येने माळ देण्याचे नाकारले, पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले. 

मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले. त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खर्‍या स्वरूपात प्रगट झाला. तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले.

 

देव कसा दिसतो | Dev Kasa Disato Marathi Goshta

Dev Kasa Disato Marathi Goshta

 

लहानगा माधव प्राथमिक शाळेत शिकत होता. एके दिवशी शाळेत वर्गशिक्षिकेने मुलांना ध्रुव बाळाची गोष्‍ट सांगितली. ध्रुव बाळाला रानात देव भेटला हे त्याला उमगले. माधवने बाईंना विचारले, ”ध्रुव किती मोठा होता?” बाई उत्तरल्या, ”तुमच्या वयाचा होता.” 

माधवचे विचारचक्र सुरू झाले. मला देव दिसेल कां? पण रान कसे असते? शाळेतील एका मोठ्या मुलाने सांगितले रानात खूप मोठी झाडे असतात. दुसर्‍या मुलाकडून समजले गावाजवळ एक मोठा पार्क आहे, तेथे खूप झाडे आहेत. माधवने गृहित धरले तेथे नक्कीच देव भेटेल. 

एका रविवारी मित्रा बरोबर पार्कमध्ये सहलीला जातो असे घरी सांगितले. आईने एका पिशवीत लाडू व सरबताची बाटली दिली. 

माधव एकटाच चालत चालत गावाबाहेरील पार्क मध्ये पोहोचला. चालून थकल्यामुळे एका झाडाखाली बसला. भूक लागल्यामुळे लाडू खाण्याकरीता पिशवी उघडू लागला. तितक्यात समोरच्या झाडाखाली त्याला एक वृद्ध गृहस्थ ‍‍दिसला. खूप भूकेला वाटत होता. माधवने एक लाडू त्याला नेऊन दिला. वृद्धाने लाडू घेतला व माधवकडे बघून स्मित हास्य केले. माधवला हे हास्य खूप सुंदर दिसले. 

हे हास्य परत बघण्याची त्याला इच्‍छा झाली. त्याने वृद्धाला सरबत नेऊन दिले. यावेळी वृद्ध अधिकच सुंदर हसला. संध्याकाळ होईपर्यंत माधव वृ्धाला लाडू, सरबत देत होता. वृद्धाच्या चेहर्‍यावरील हास्य अधिकच खुलत होते. अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जाण्यास निघाला. वृद्धाने त्याला प्रेमाने पोटाशी घेतले. माधव खूपच आंनदीत झाला. 

घरी पोहचताच आईने त्याची आनंदी मुद्रा बघून विचारले, सहल छान झाली वाटते. 

माधव उत्तरला, की आज देवा बरोबर फराळ केला. किती छान हसत होता तो. असे हास्य मी आजवर कधीच बघितले नव्हते. 

पार्क मधील वृद्ध देखील आनंदात घरी गेला. मुलाने विचारले, ‘बाबा तुम्ही आज एवढे आनंदी कसे?’ 

मराठी