Mahashivratri Status in Marathi | Mahashivratri messages Marathi | Mahashivratri status Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri Status in Marathi

????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / Mahashivratri wishes Marathi.???? Mahashivratri messages Marathi: मित्रांनो, आजच्या या लेखात आम्ही भगवान भोलेनाथांचा …

मराठी

Horror Story in Marathi | Bhutachya Goshti | Bhoot katha in marathi | Marathi bhaykatha

Horror Story in Marathi | Bhutachya Goshti | Bhoot Katha in Marathi 

Horror Story in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखात मी नवीन marathi Bhoot katha घेऊन आलो आहे. आमच्या या कथा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या मित्रांसोबत या कथा शेअर नक्की करा. 

 

अनुभव | Horror Story in Marathi

bhoot katha in marathi

 

या कथेतून मी अंधश्रधेला बढावा देत नाही किवा कुणाच्या भावनांसोबत खेळत नाही हा एक मला आलेला अनुभव मी कथन करत आहे. 

 

मी त्या वेळी अग्री डिप्लोमा साठी गिरवी येथे शिकत होतो. सकाळी 9 वाजता 10-11 किमी सायकल वरून तालुक्याच्या ठिकाणी जायचो. व तेथून बसने कॉलेज वर. 5 वाजता कॉलेज सुटल्यावर 7 वाजेपर्यंत घरी. तसा हा प्रवास रोजचाच. 

 

कॉलेजमध्ये आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. आम्ही म्हणजे एकदम आगाऊ कारटी होतो. नेहमी पैजा लावणे व एखाद्याला सर्वांचे बिल भरायला लावणे. असे आमचे उदयोग. तिथल्या सरांना त्रास देणे वगैरे रोजचेच. 

 

एकदा असाच मित्रांबरोबर बसलेलो असताना पैज लागली की बघू कोण आज ऊशीरा पर्यंत कोण थांबतय. सर्वजन थांबले खरे पण हळू हळू एक एक जन काढता पाय घेऊ लागला. मग शेवटी मी आणि अजून तिघे जन उरलो. मग शेवटी आम्ही पण म्हंटलं चला आता निघायला हवे 7 वाजत आले होते.पावसल्याचे दिवस होते व आभाळ ही भरून आले होते. 

 

पूर्ण अंधार पडला होता. मग तेथून मी मित्राच्याच गाडीवर स्टँड पर्यंत आलो सायकल घेतली. व घराकडे निघालो पण पाऊस सुरू झाला होता. पण अजून थांबून जमनार नव्हते. त्यावेळी मोबाइल ही नव्हता माझ्याकडे त्यामुळे घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता. घरी येताना रस्त्यात खूप दाट झाडी होती. मी भर पाऊसात सायकल चालवत होतो. मी ज्यावेळी त्या दाट झाडीत आलो व अचानक वीज कडाडली व माझ्यासमोर तीन बायका चालत येताना दिसल्या.रंगाने खूप गोर्याच होत्या त्या एवढ्या रात्रीच्या कुठे गेल्या असतील असा विचार येऊन गेला मनात, पण जस जसे मी जवळ जाऊ लागलो तसे एका बाईने माझ्या थोबाडीत मारण्यासाठि हात उचलला पण मी तो हुकवला व पुढे जाऊन मागे बघण्यासाठी थांबलो तर मागे कुणीच नव्हते. मी खूप घाबरलो होतो. व जास्त वेळ तिथे न थांबता तडक घरी निघून आलो. घरी येईपर्यंत 8:30 वाजले घरी आल्यावर घरच्यांची खूप बोलणी बसली. म्हणून काही सांगितले ही नाही की काय घडले माझ्या सोबत, मग तसच जेवण केल व झोपलो. सकाळी जाग आली ती खूप उशिरा जरा ताप ही वाटत होता अंगात. हळू हळू ताप जास्तच वाढू लागला. मग संध्याकाळी दवाखान्यात वडलांबरोबर गेलो व गोळ्या इंजेक्शन दिले. घरी आलो पण ताप कमी झाला नाही. रात्री जरा उठलो व बाहेर आलो जरा अंगणाच्या पुढे जाऊन थांबलो तर समोरच्या रानात कोणीतरी उभे असलेले दिसले पण मनात म्हणले की पानी चालू असेल रानात व परत येऊन झोपलो. 

 

पण पावसाळ्यात कशाला पाण्याची गरज नसते हे नंतर लक्षात आले. सकाळपर्यंत ताप खूप वाढला होता. वडील तर खूप शिव्या द्यायचचे की कधीच आजारी न पडणारा पोरगा एवढा कस काय आजारी पडला. डॉक्टरांचा ही काही फरक पडत नव्हता. मग शेवटी आई च्या सांगण्यावरून वडील गावातील एका जुन्या जाणकार बाईकडे गेले. ती बाई सर्वांचे सांगायची तसे वडील तिज्याकडे गेले व सांगितले की दोन दिवस आजारी पडलाय मूलगा डॉक्टर कडे पण न्हेलता पण काही फरक पडला नाही. मग त्यांनीच पुढचे सांगितले की याला चिन्ह दिसले होते त्या ठिकाणी त्यासाठी 21 कडधान्याचा पुतळा करून वाहत्या पाण्यात सोडून द्या. 

 

त्यानंतर वडील घरी आले व 21 कडधान्य शोधू लागले व त्याचे पिट करून पुतळा तयार केला व तो फाट्यात सोडून दिला.जसा पुतळा सोडला तस त्यांना पाण्यात एक लहान मुलगा दिसल्याचा भास झाला. व ते तिथून लगेच माघारी फिरले व घरी आले. मग माझा ताप हळू हळू कमी झाला. व मी त्यानंतर बरा झालो. मग त्यानंतर मी कधी जास्त उशिर केला नाही घरी यायला. 

 

 

गूढकथा | Bhutachya Goshti Marathi madhe

 

आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये गेलो होतो. पूर्वी रोज जायचो पण आताशा बाहेरील कामामुळे रोज रोज जाणे नाही होत. बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे ऑफिस मधील बरीच कामे पेंडिंग पडली होती ती संपवता संपवता कधी ऑफिस बंद करायची वेळ झाली ते समजलेच नाही. स्टाफ निघून गेला आणि माझ्याकडे पण ऑफिसची चावी असल्याने मी थांबून राहिलो. आज सगळी कामे संपवूनच जायचे म्हणून आपला कॉम्प्युटरवर काम करत होतो. माझ्या ऑफिसच्या बाहेर निलगिरीची 3-4 झाडे आहेत. त्याकडे कधी असं फारसं लक्ष जात नाही पण आज सारखं त्या झाडांचं अस्तित्व जाणवत होतं. का कुणास ठाऊक पण ती झाडे तेथे आहेत हे आज जेवढं जाणवत होतं तेवढी जाणीव गेल्या 10 वर्षात कशी काय झाली नाही कुणास ठाऊक? थोड्या थोड्या वेळाने असा काही वारा यायचा की त्या पानांची सळसळ पार माझ्या मेंदूला स्पर्श करून जायची. वेळ जात होता तशी ही सळसळ जरा जास्तच वाढली. एवढी की जणू काही मी एखाद्या भयाण अरण्यात आहे आणि जोराचे वादळ सुटलेय. एवढ्यात जिन्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला.  

 

आता एवढ्या रात्री कोण कस्टमर आला म्हणून जरा आश्चर्य तर वाटले पण मनातून जरा खुश पण झालो की आज ऑफिसला उशिरापर्यंत थांबल्याचा फायदा झाला बहुतेक. पावलांचा आवाज आता जवळ येत गेला. अगदी दाराशी आला तसा मी दरवाज्याकडे पाहिले तर दरवाज्यात माझ्या मित्राची आई! मी विचार केला की एवढ्या रात्री ह्या इथे कशा? पण हा विचार चालू असतानाच त्या एकदम आत आल्या आणि माझ्या अगदी समोर बसल्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो कारण मित्राची आई म्हणजे जवळपास माझ्याच आईच्या वयाची… पण काय मेंटेन केलंय राव. मी लहानपणी त्यांच्या घरी जायचो तेंव्हा मला चॉकलेट देणाऱ्या ह्याच त्या. आख्या घरातलं काम उरकून बाहेर कामाला जायच्या. कामावरून आल्यावर परत घरातला पसारा आवरून स्वयंपाक करायला लागायच्या. केवढि ती एनर्जी. लहानपणी तेवढं कळायचं नाही पण आता जाणवत की एवढं काम करणं म्हणजे तोंडाच्या गप्पा नाहीत. आणि त्याच मित्राचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता की आई फार थकलीय आता. काम होत नाही, जास्त चालवत नाही. एका जागेवर बसून असते वगैरे वगैरे. पण आता त्यांच्याकडे पाहून अस काही मला तर वाटलं नाही. 25 वर्षांपूर्वी जशा होत्या अगदी तशाच होत्या त्या. ‘पप्या आलाय का तुझ्याकडे’ हा प्रश्न कानावर पडताच मी माझ्या विचारातून जागा झालो.  

 

पप्या मला गेल्या 3 वर्षात भेटला नाही हे त्यांना सांगायचे होते पण माझ्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाहीत. पण त्यांना बहुतेक कळले असावे मला काय म्हणायचंय ते. त्या ताडकन उठल्या आणि निघाल्या. जिन्यातून हळू जा म्हणायला मी दारात गेलो तर त्या तिथे दिसल्याच नाहीत. काय स्पीडने पायऱ्या उतरल्या असतील त्यांनाच माहीत. मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की पप्याने आई थकलीय, तिला चालवत नाही असे कसे मला सांगितले? मी आज माझ्या डोळ्यांनी बघितले त्यांना तर 25 वर्ष्यापूर्वी जशा होत्या तशाच होत्या त्या. मनातले विचार तसेच ठेवत मी माझा डबा घेतला आणि निघणार तेवढ्यात डबा थोडा जड लागला म्हणून डबा उघडून बघितले तर लक्षात आले की आज आपण जेवलोच नाहीय. पोटात भूक लागलीय हे मला जाणवले. 2 घास खाऊन मग निघू असा विचार करून परत बसलो. आणि डब्यातील मेनू बघून डोकेच फिरले. डब्यात तूप, साखर, पोळीचे 2 छोटे रोल दिले होते. लहानपणी आई द्यायची डब्यात तसे. पण आता मी काय लहान राहिलोय का असा रोल खायला? बायको पण राव अँटिकच पीस आहे. हे 2 रोल पोटाच्या कुठच्या कोपऱ्यात जाऊन पडतील तेही कळणार नाही. माझी मुलगी एका घासात संपवेल हे. आणि मला दिवसभराचा डबा म्हणून हे दिलंय. डबा बंद केला आणि घरी जाऊनच जेवू असा विचार करत ऑफिस बंद केले आणि निघालो.  

 

खाली उतरलो तर समोर ऑफिसचा वाचमन दिसला. त्याला सहजच काय चाललंय विचारावे म्हणाले तर तोच आपणहून म्हणाला, पप्पा नाही आले का आज? मी मनात विचार केला ह्याचे बहुतेक डोके फिरलेय. आज एवढ्या वर्षात माझे वडील कधी ऑफिसला आले नाहीत आणि याला बरी आज त्यांची आठवण आली. त्याच्याकडे पाहून मी नुसता कसनुसा हसलो आणि कारकडे निघालो. कार काढली आणि घराच्या दिशेने निघालो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाडी तर मी नीटच चालवत होतो पण शेजारून जाणारा प्रत्येक जण अगदी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. मी ठरवले की सगळ्यांचे डोके फिरलेय बहुतेक. आपण कुणाकडे लक्षच द्यायचं नाही. पण पुढच्या सिग्नलवर एका पोलिसाने अडविलेच. त्याला लायसन्स दाखवायला पाकिटात हात घातला तेंव्हा लक्षात आले की आज पाकीट घरीच विसरून आलोय. तेवढ्यात तो पोलिसच म्हणाला बाळा, सोबत कोणी नसताना अशी एकट्याने गाडी चालवणे चांगले नाही. खरं तर मला त्याचा खूप राग आला होता. साला हा माझ्याच वयाचा किंवा 1/2 वर्षांनी लहान पण असेल आणि मीच बाळा? पण जाऊ दे, चूक आपलीच आहे. आपणच पाकीट नव्हते विसरायला पाहिजे होतं. मी काही न बोलता निघालो.  

 

गेटवरून गाडी माझ्या बिल्डींगपाशी आणली आणि माझ्या नेहमीच्या जागेवर पार्क केली. गाडीतून उतरलो तेवढ्यात एक जोडपं वॉक करायला निघालं होत. मी त्यांना क्रॉस करून पुढे आलो तोच त्यांची कुजबुज माझ्या कानावर पडली, आईबापांना कळलं पाहिजे ना की मुलांच्या हातात एवढी मोठी गाडी कशी द्यावी. त्यांना सूनवायची खूप इच्छा होती पण मन आवरले आणि लिफ्टकडे वळलो. लिफ्टने घराबाहेर आलो आणि बेल वाजवली. बायकोने दार उघडले आणि लगेच बंद केले. अरेच्चा हे काय? असा विचार करत मी तसाच जिन्यात बसलो. एवढ्या वर्षात हिने मला बघून कधी दार बंद नाही केले आज असे काय झाले असा विचार मी करत असतानाच माझा मोबाईल वाजला. तर बायकोचाच फोन होता. तिला आता झापायचेच ठरवून जरा रागातच फोन उचलला. तर तिकडून बायको घाबऱ्या आवाजात सांगत होती की अहो, रात्रीचे 2 वाजलेत आणि कोणीतरी 8-10 वर्षाचा मुलगा आपल्या दारात उभा राहून बेल वाजवतोय. आता मात्र माझे डोकेच फिरले. फोन कट करून मी लिफ्टकडे वळलो. लिफ्ट आली आणि मी लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमधील आरशात सहज नजर गेली आणि माझ्या हातातील डब्याची पिशवी व मोबाईल खालीच गळुन पडला. कारण आरश्यात मी नव्हतोच. बायकोने वर्णन केलेला तो 8-10 वर्षाचा मुलगा माझ्याकडेच पहात उभा होता. 

 

 

मराठी