श्रीमंत विरुद्ध गरीब मानसिकता | Rich vs Poor Mentality In Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

श्रीमंत विरुद्ध गरीब मानसिकता | Rich vs Poor Mentality In Marathi

काही लोक वाळवी सारखे असतात, तुम्हाला जाणून पण देणार नाहीत परंतु तुम्हाला आतून पूर्णपणे पोखरून टाकतील. त्यामुळे स्वतःला मजबूत बनवून ठेवणे तुमची स्वतःची जबाबदारी आहे. स्वतःची मदत तुम्हाला स्वतः करावी लागणार आहे. बोलण्यातून फक्त आधार मिळतो, मदत नाही. पैसे कमावणे आणि सफल होणे खूप गरजेचे आहे. मी हे नाही म्हणत ये की पैसाच सर्व काही असतो, परंतु पैसे ते इंधन आहे ज्याने आयुष्याची गाडी चालते, जर गाडीचा टॅंक खाली झाला तर ती पुढे जाणार नाही. जर तुम्ही आर्थिक रूपाने मजबूत आहात तर तुम्ही स्वतःची आणि दुसऱ्याची देखील मदत करू शकता. 
 

त्यामुळे उशिरा का होईना परंतु काहीतरी नक्की बना. जीवनात इतकं काही नक्की मिळवा की तुमच्या मुलांना दुसऱ्यांचे उदाहरण द्यावे लागायला नको. इतकं तर नक्की मिळवा की दुसऱ्यांच्या पायाशी आणि आपल्या नजरेत पडायला नको. हे आयुष्य एक खेळ आहे आणि हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला काय बनायचे आहे, खेळाडू की खेळणं! 

 

विज्ञापन ADVERTISEMENT

लक्षात ठेवा की हा संपूर्ण खेळ विश्वासाचा आहे, म्हणून तर मातीच्या घड्यात लोखंडाचे नाणे सुरक्षित राहतात. विश्वास ठेवा, स्वतःच्या निर्णयावर भरवसा ठेवा, थोडा वेळ लागेल पण तुमची वेळ नक्कीच येईल. विश्वास असेल तर तुम्हाला अलार्म घड्याळाची गरज भासणार नाही, तुमचे ध्येय तुम्हाला दररोज सकाळी उठवेल. 

 

श्रीमंत होण्यासाठी हे 4 नियम कायम लक्षात ठेवा, कधीच आपल्या मिळकती पेक्षा जास्त खर्च करू नका आणि कर्ज तर बिलकुल घेऊ नका. कधीच त्या गोष्टींना गरज नसताना खरेदी करू नका, ज्यांची किंमत वेळेनुसार कमी होत जाते. दुसऱ्यांच्या समोर देखावा करण्यासाठी पैसे खर्च करू नका, लक्षात ठेवा साधे जीवन हेच उत्तम असते, त्यात लाजण्यासारखी काही गोष्ट नाहीये. 

विज्ञापन ADVERTISEMENT

 

शेवटचा नियम आहे पैसे साठवणे, जे खूप महत्वाचे आहे. सेव्हिंग सोबत त्या पैशाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणे देखील शिका. मित्रांनो पैशापासून पैसे बनवणे ही एक कला आहे आणि ही शिकणे खूप गरजेचे असते. 

 

विज्ञापन ADVERTISEMENT

मित्रांनो ज्याप्रमाणे गणितात चांगले होण्यासाठी गणिताचे नियम माहीत असायला हवेत तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी यशाचे नियम माहीत असायला हवेत. यशाचा फक्त एकच नियम आहे तो म्हणजे सुरुवात करणे! कोणीतरी खूप मोठं विधान केलेलं आहे की सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाहीये, परंतु महान होण्यासाठी सुरुवात करण्याची आवश्यकता नक्कीच असते. खूप सारे लोक जीवनात सुरुवात करतच नाहीत, कारण त्यांना कदाचित हे माहीत नाहीये की जे अगोदरपासून करत आलोय तेच पुढे करत गेलो तर तेच भेटत राहील जे आजपर्यंत भेटत आले आहे. म्हणायचं अर्थ एकच आहे की काहीतरी मोठं हवं असेल तर काहीतरी मोठं कराव लागेल आणि दूरवर विचार करावा लागेल आणि थोडी रिस्क देखील घ्यावि लागेल. 

 

आम्ही देखील मानतो की थोडीफार समस्या नक्की येणार आहे, परंतु लक्षात ठेवा की कडू औषधच तुम्हाला बरे करू शकते. ही गोष्ट सर्वांना माहीत असते त्यामुळे तर लोक हसत हसत औषध घेत असतात. ही गोष्ट तुम्हाला देखील माहीत असायला हवी की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी संघर्ष तर करावाच लागणार आहे. 

 

व्हिडिओच्या शेवटी एकच सांगेल की तुटण्याच्या अगोदर पैशांच्या गल्ल्याला देखील वाटत असते की सर्व पैसे त्याचे आहेत, तसेच एका अयशस्वी मनुष्याला वाटत असते की सर्व चूक ही दुसऱ्याची आहे, जर दुसऱ्यांच्या चुकांनी तुमच्या आयुष्यात काही फरक पडत असेल तर तुमच्याहून मूर्ख या जगात दुसरं कोणी नाहीये. त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा जास्त योग्य आहे आपल्या स्वतःच्या चुका शोधा, आणि त्यांनी तुम्हाला संपवण्याच्या आधी त्या चुका संपवून टाका.

Also Read

Indian Navy Recruitment 2022


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.