लोकं नाव ठेवतात त्याच उत्तर कसं द्यायचं | How to Prove yourself in Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

लोकं नाव ठेवतात त्याच उत्तर कसं द्यायचं? | How to Prove yourself in Marathi

हां, ते हसतील कारण त्यांनी त्यांच्या सभोवताली पहिल्यांदा असा मनुष्य पाहिला आहे जो त्यांच्या सोसायटीच्या लेव्हल पेक्षा खुप मोठे स्वप्न बघत आहे. लोकांमध्ये कुतूहल आहे आणि त्यांच्या चर्चेचा विषय हाच आहे की बघा हा पुढे जाऊन पराभूत होईल! कारण त्यांना असे वाटते की त्यांनी स्वतः ते काम केले असते तर ते स्वतः पराभूत झाले असते.

परंतु मला माहिती आहे कि तुझ्या ध्येयाला गाठण्यासाठी कोणत्याहि परिस्थितिचा सामना तू करू शकतो! जगाने ठेवलेले नाव देखील तुझ्या प्रवासाचा एक भाग आहे, आणि हा खूप महत्वाचा भाग आहे.

विज्ञापन ADVERTISEMENT

अरे कुठलाही आवाज न ऐकता तुम्ही बसने एका शहरातून दुसऱ्या शहरात देखील जाऊ शकत नाहीत. तुम्हाला बस चा आवाज हा ऐकावाच लागणार आहे. त्या फटाक्यांची रोषणाई देखील आवाज झाल्याशिवाय बघायला मिळत नाही. ऐकावे तर लागणारच आहे.

एक खूप जुनी गोष्ट आहे ती म्हणजे खरा यशस्वी व्यक्ती तो आहे जो त्याच्यावर फेकले गेलेल्या दगडांपासून देखील घर बनवतो. त्यामुळे लोकांना काही हि बोलू द्या. कारण तुमचे ध्येयाला प्राप्त करण्यासाठी असलेला वेडेपणा हा लोकांसाठी काहीतरी नवीन आहे.

आता हेच बघा ना जेव्हा कधी आपण नवीन ड्रेस पहिल्या दिवशी घालतो तेव्हा आपल्याकडे पुन्हा पुन्हा बघितले जाते. त्यामुळे आपल्या नवीन
वेडेपणावर सभोवताली असलेले लोक कमेंट करणार नाहीत का? त्यांनी उडवलेली तुमची खिल्ली, त्यांचे नकारात्मक बोलणे, यांना खोटे ठरवण्यासाठी तितकाच वेळ लागेल जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय गाठत नाही!

विज्ञापन ADVERTISEMENT

तसे बघायला गेले तर बरोबरच तर आहे, जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं कराल, तुमच्या ध्येयाला प्राप्त कराल तेव्हा काही लोकांचे चेहरे हे बघण्यासारखे झालेले असतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते, तेच लोक आज इतरांना किती अभिमानाने सांगतात की हो, मी त्याला किंवा तिला ओळखतो! आम्ही त्याला सांगत होतो की इतक मोठं स्वप्न बघू नकोस, हे सर्व आपल्या क्षमतेच्या बाहेरचे आहे, परंतु खरंच त्याला मानायला हवे. आम्ही उडवलेली त्याची खिल्ली त्याने हसून स्वीकारली आणि आज बघा तो खरच यशस्वी झालेला आहे.

असेच होते या जगात, नाव तोपर्यंत ठेवले जाते जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाहीत. त्यानंतरच हे नाव ठेवणे आपोआप बंद होईल.

त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याने स्वतःमध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होऊ देऊ नका. फक्त एक स्मित हास्य दाखवून पुढे जात रहा. कारण तुम्ही जर त्यांच्याशी वाद घालत असाल तर त्यांच्यासाठी चर्चेचा विषय आणखी वाढेल आणि तुमची ऊर्जा तिकडे परावर्तित देखील होईल.

विज्ञापन ADVERTISEMENT

त्यामुळे फक्त लक्ष केंद्रित करा,
फक्त त्यावर जे तुमचे ध्येय आहे,
त्यावर जे तुम्हाला आवडते,
त्यावर ज्याने जगात तुमची ओळख बनणार आहे,
त्यावर ज्यासाठी तुम्ही सक्षम आणि लायक आहात

जय हिंद वंदे मातरम!

Inspirational Thoughts of Ratan Tata in Marathi

अधिक वाचा????????????

डिलिव्हरी कशी करतात?


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.