सेल्फ मोटिव्हेशन मराठीत महत्त्व | Self Motivation Importance in Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

 सेल्फ मोटिव्हेशन हे मराठीत महत्त्व आहे | Self Motivation Importance in Marathi

जेवणात कोणी विष टाकेल तर त्याचा इलाज होऊ शकतो, परंतु एखाद्याच्या कानामध्ये कोणी विष कालवले तर त्याचा इलाज होऊ शकत नाही. कारण तुम्ही तुमच्या विचारांना कंट्रोल करु शकत नाही. तुमच्या डोक्यात कोण कधी काय भरवेल या गोष्टीला देखील तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे मित्रानो कायम आपली संगत ही विचारपूर्वक निवडा. जशा लोकांसोबत तुम्ही रहाल तशा गोष्टी तुमच्या डोक्यात भरवल्या जातील. खूप लोक बोलतात की मोटिव्हेशनल व्हिडीओ बघितल्यानंतर त्याचा प्रभाव हा काही दिवस राहतो, परंतु पुन्हा सर्व काही जसे होते तसेच राहते.

 तर एक गोष्ट ऐका, एकेकाळी एक मनुष्याच्या पोटात खूप दुखत असे. तो डॉक्टर कडे गेला तर डॉक्टर ने सांगितले की तुमचा आहार ठीक नाहीये, तुमची दिनचर्या ठीक नाहीये, तुम्ही व्यायाम करत नाही, तुम्ही मेहनत करत नाही, शरीराची काळजी घेत नाही, कायम काहीही उलट सुलट खातात आणि कधीही खातात आणि खातच राहतात त्यामुळे तुमच्या पोटाची यंत्रणा पूर्ण बिघडली आहे. हे काही औषध मी लिहून देतो आहे, ते घ्या, यांनी आराम भेटेल परंतु तुमच्या खाण्याच्या पद्धतीत बदल करा, सवयी बदला. त्या मनुष्याने आनंदाने औषधे विकत घेतली आणि खाल्ली देखील. त्याचा त्रास देखील कमी झाला परंतु डॉक्टर ने सांगितलेल्या गोष्टींवर त्याने लक्ष दिले नाही. का लक्ष देईल? आता तर त्याचा त्रास पूर्णपणे नाहीसा झालेला होता. परत त्याने तेच सुरू केले, काहीही खायचे, शरीरावर तो अगोदर पण लक्ष देत नव्हता आणि आता आणखी देत नाही. काही दिवसांनी त्याची तब्येत आणखी बिघडली. यावेळी तो दुसऱ्या डॉक्टर कडे गेला कारण त्याला असे वाटत होते की जुन्या डॉक्टर च्या औषधांचा प्रभाव काही वेळेपुरता होता आणि डॉक्टर बदलून काहीतरी फायदा होईल. परत तेच झाले, औषधांनी त्याला बरे तर केले परंतू चुकीच्या सवयीनं तो पुन्हा आजारी पडला.  त्याने जवळपास 10 वेळा डॉक्टर कडून आजाराचा उपचार घेतला परंतु त्याच्या आजारात काही सुधारणा झाली नाही. आता परिस्थिती अशी होती की डॉक्टर वरून त्याचा विश्वास उडाला होता, तो कायम डॉक्टर विषयी हेच म्हणत होता की हे सर्व लोक लुटतात, यांच्या औषधांचा प्रभाव हा काही दिवस असतो आणि त्यांनंतर पुन्हा आजारी पडतो. डॉक्टर कडे जाणे बेकार आहे आणि यांच्या डिग्री देखील बेकार आहे. औषधे देखील बेकार आहेत आणि ही पूर्ण सिस्टम (यंत्रणा)  देखील बेकार आहे.  मला तुम्हाला समजून सांगायची गरज नाहीये की या कथेतून मी तुम्हाला काय सांगू इच्छितो. इतका मला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्हाला समजून जाईल की माझा इशारा कुठे आहे. मित्रांनो कोणत्या गोष्टीने तुम्हाला फायदा होत नसेल तर विचार करा की तुमच्यामध्ये कुठे कमतरता आहे. असे कुठले काम आहे जे तुम्ही करत नाही? कारण आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला नाव ठेवणे हे जगातील सर्वात सोप्पे काम आहे. दुसऱ्याला दोषी ठरवणे आणि त्याच्यावर नको नको ते आरोप करणे! यातून दुसऱ्याच काही बिघडणार नाहीये परंतु तुमचं आयुष्य खराब होऊन जाईल. कारण एकदा जर तुम्हाला ही सवय लागली तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही दुसऱ्याला दोष देत रहाल.  हीच गोष्ट आजच्या घडीला घडते आहे. ज्या दिवशी तुमच्यात ताकद येईल स्वतःला दोष देण्याची, माझ्यात कमी आहे मी करू शकत नाहीये, जेव्हा तुमच्यात ताकद येईल स्वतःला सुधारवण्याची की मी करेल मी करू शकतो, त्या दिवशी तुमचे विचार, तुमचे नशीब , तुमचे आयुष्य आणि तुमचे भविष्य या चारही गोष्टी बदलून जातील…

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.